मुंबईत वाहतूक ठप्प; शाळांना सुट्टी देण्याच्या शेलार यांच्या सूचना

Foto

मुंबई: मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर या भागांमध्ये गेल्या चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. गेल्या २४ तासात मुंबईत ५० ते १०० मि.मी. तर उपनगरांमध्ये १५० ते १८० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रुझमध्ये १९२ मि.मी. तर कुलाब्यात ७३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाची स्थिती लक्षात घेऊन शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय राज्यातील मुख्याध्यापक घेऊ शकतात, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिल्या आहेत. 

मुंबईसह किंग्ज सर्कल, सायन, माटुंगा, कुर्ला या परिसरात पावसाचा जोर वाढला असून, अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचले आहे. उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात तर पाणी प्लॅटफॉर्मपर्यंत पोहचले आहे. वांगणीतील रेल्वे रुळांवर साचलेल्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून, बदलापूर आणि कर्जत-खोपोली दरम्यानची रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने बदलापूर, कर्जत-खोपोली मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. लांबपल्ल्याच्या अनेक गाड्या कल्याण, इगतपुरी, मनमाड, दौंड मार्गे वळवण्यात आल्या आहेत. लोकलमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना सोडवण्यासाठी एनडीआरएफच्या पथकाने रात्रीपासून मदतकार्य सुरू केले आहे. अंबरनाथला बी केबिन परिसरात बदलापूरहून आलेली लोकल रात्री १० वाजल्यापासून पहाटे तीन वाजेपर्यंत रखडली. त्यात अडकलेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. एनडीआरएफचे पथक येण्यापूर्वीच रेल्वे कर्मचारी आणि आरपीएफच्या कर्मचार्‍यांनी प्रवाशांना बाहेर काढले होते. मात्र, अनेक प्रवाशांनी गाडीतच राहणे पसंत केले.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker